अहिल्यानगरमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट!
विक्रम राठोड यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली कारवाईची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर शहरात सध्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा रिहिंग्यांचा सुळसुळाट असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. बाजारपेठ, चौक व वसाहतींमध्ये महिला व युवतींशी संपर्क साधून त्रास देणारे, बांगड्या विकणारे, मेहंदी लावणारे, गोंदवणारे असे अनेक संशयित नागरिक शहरात खुलेआम वावरत आहेत. विशेष म्हणजे शहराचे मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारात मोची गल्ली, घास गल्ली गंज बाजार पंचपिर चावडी, कोठला स्टॅन्ड, मुकुंदनगर, भूषण नगर, एसटी स्टँड, माळीवाडा येथील दुकाने व्यावसायिक तसेच मजूर कारागीर म्हणून या बांगलादेशी घुसखोरांचा रोहिंग्या यांचा यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे
या घुसखोरांची ओळखपत्रे नाहीत, बनावट आधार/रेशनकार्ड वापरले जात आहे, तसेच काहींची नावे मतदार यादीत सुद्धा आढळून आली आहेत, हे अत्यंत चिंताजनक आहे. हे लोक अनेकदा महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याच्या तक्रारी समोर येत असून, हॉटेल उद्योगातही वेटर, कुक म्हणून यांचा वावर वाढला आहे.
त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले असता ते उडवा उडवीची उत्तरे देतात. गेल्या पंधरा वर्षापासून आपण नगरमध्येच राहत असून मूळचे कुठले असे विचारले असता ते युपी बिहारी बंगाली किंवा आसामी मिझोराम चे असल्याचे सांगतात .
या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष वेधून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) युवासेना राज्य सहसचिव व माजी नगरसेवक विक्रम अनिल भैया राठोड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. या घुसखोरांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व त्यांना परत पाठवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शहराची शांतता व महिलांची सुरक्षितता धोक्यात येत असताना तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
युवा सेनेचे सहसचिव विक्रमभैय्या राठोड उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे सर राष्ट्रनिर्माण पार्टीचे उत्कर्षजी गीते दिलदार सिंग बीर शुभम मीरांडे पंकज राठोड शहर प्रमुख प्रतीक भंडारी
श्याम सोनवणे मृणाल भिंगारदिवे नरेश भालेराव महेश शेळके विकी पवार मनोज चव्हाण जिग्नेश जग्गड अक्षय नागापुरे श्रीकांत चिमटे सुनील त्रिपाठी सुमित धेंड शंकर मामा दांगडे


