बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक …..दोन्ही जागा बिनविरोध होणार !

भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत तारखांची घोषणा करत मविआ आणि महायुतीकडे मोठी मागणी केली.

या दोन्ही जागा बिनविरोध व्हावेत, यासाठी दोन्ही बाजूने सामंजस्याने भूमिका घ्यावी, आपण त्यासाठी सर्वोपरी सहकार्याची भूमिका घेऊ, असे विखे पाटील यांन म्हटले. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची दहा ते 12 मार्चमध्ये घोषणा होईल, असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले. बंगाल, तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी आणि आसाम या पाच राज्याच्या निवडणुकीबरोबर महाराष्ट्रातील पोट निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन ठिकाणी पोटनिवडणूक होईल. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधानानंतर तिथल्या जागेची जबाबदारी आमची आहे. राहुरीमधील उमेदवाराबाबात आपण भाष्य करण्याचा अधिकार नाही. तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे अधिकार आहे, असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे की, शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना तिथं संधी मिळावी. कार्यकर्त्यांची देखील तशी भावना आहे. कार्यकर्त्यांनी नेता म्हणून त्यांची भावना माझ्याकडे व्यक्त केली. माझा नेता मुख्यमंत्री आहे. आता इथल्या उमेदवाराचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री राहुरील जनभावनेचा आदर करतील, अन् उमेदवाराला संधी देतील. आम्ही देखील निवडणुकीला समोरे जाण्यासाठी सज्ज आहोत. निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहोत. महाराष्ट्रात दोन पोटनिवडणुका होत आहे.राहुरीबरोबर बारामतीचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दोन्ही आघाड्यावर याबाबच चर्चा होईल. अनेक राजकीय घडामोडी घडतील, असे सांगताच राहुरी विधानसभेत महायुती, त्यात भाजपचाच आमदार होईल, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.

राहुरी आणि बारामतीमधील रिक्त झालेल्या जागांवर दिग्गज नेते होते. दोन्ही जागांवरील उमेदवारांचे मृत्यू दुर्दैवानं झाले. कर्डिले यांचे निधन अचानक झालं, तर अजितदादांचे अपघाती निधन हे दुर्भाग्यपूर्ण होती. त्यामुळे महाराष्ट्राने आदर्श घडवावा, दोन्ही विधानसभेत तडजोड करून, सकारात्मकतेने बिनविरोध कराव्यात, अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles