बीडच्या जिल्हा हिवताप विभागातील मोठी घटना समोर आली असून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एरीअर्सच्या तब्बल 90 लाख रुपये अतिरिक्त उचलल्या प्रकरणी जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंह शिंदे यांचं निलंबन करण्यात आले आहे.
या कारवाईने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे वैद्यकीय एरिअर्सच्या नावाखाली विजय सिंग शिंदे यांनी 89 लाखाहून अधिक रुपयांची अतिरिक्त रक्कम उचलल्याचा गैरप्रकार नुकताच उघडकीस आला होता आणि या प्रकरणानंतर जिल्हा हिवताप विभागात खळबळ उडाली होती.
तर आता जिल्हा होता अधिकारी विजयसिंह शिंदे यांच्यावर आरोग्यसेवा आयुक्तालयाने थेट कार्यवाही करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे या कार्यवाहीमुळे बीड जिल्ह्याचे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडवून देणारी ठरली आहे.
आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी आर्थिक अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत अधिकारी विजयसिंग विठ्ठलराव शिंदे (गट-ब) यांना तडकाफडकी निलंबित के


