Thursday, February 26, 2026

भानुदास कोतकर केडगावच्या प्रचारात सक्रिय होताच नगरच्या राजकारणात खळबळ!

भानुदास कोतकर प्रचारात सक्रिय होताच नगरच्या राजकारणात खळबळ!

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत केडगावच्या ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर हे पुन्हा एकदा प्रचाराच्या मैदानात सक्रिय झाले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून काही कारणांमुळे प्रचारापासून अलिप्त असलेले कोतकर अचानक सक्रिय झाल्याने केडगावच्या राजकीय समीकरणांत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भानुदास कोतकर हे केडगावच्या राजकारणातील एक केंद्रबिंदू मानले जातात. ते पुन्हा सक्रिय झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच कोतकर समर्थकांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. कोतकर यांनी थेट शाहूनगर परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या यारी एन्ट्रीमुळे सुस्तावलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य संचारले असून, प्रचाराची गती आता अनेक पटीने वाढली आहे.

यावेळच्या निवडणुकीत भानुदास कोतकर यांनी प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मध्ये आपले प्रबळ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. कोतकर स्वतः मैदानात उतरून व्यूहरचना आखत असल्याने विरोधी उमेदवारांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. कोतकरांचा दांडगा अनुभव आणि जुना जनसंपर्क पाहता, आगामी काही दिवसांत केडगावच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात.

एकीकडे महायुती, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि तिसरीकडे कोतकरांचे समर्थक असा त्रिकोणी संघर्ष प्रभाग १६ आणि १७ मध्ये अधिक तीव्र झाला आहे. भानुदास कोतकर यांच्या सक्रियतेने मतदानाची टक्केवारी आणि मतदारांचा कौल कोणाकडे झुकणार, याकडे संपूर्ण शहराचे आणि जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles