भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीची बैठक संपन्न.
आखेर समिती व समाजामध्ये एक मुखी ठराव मंजूर.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी 27 जुलै ला होणार अनावरण.
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या संदर्भात अनेक दिवसांपासून शहरात अनावरणाची चर्चा सुरू होती या अनुषंगाने पुतळा कृती समिती व आंबेडकरी समाजाच्या वतीने आज बैठक घेण्यात आली या बैठकीत एक मताने निर्णय घेऊन येणाऱ्या 27 जुलै ला रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण संध्याकाळी 6 वाजता थाटात साजरा होणार असल्याचे बैठकीचे अध्यक्ष विजय भांबळ यांनी व्यक्त केले यावेळी आमदार संग्राम जगताप, पूर्ण कृती पुतळा समितीचे सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, अजय साळवे, नाथा अल्हाट, किरण दाभाडे, प्रशांत गायकवाड, प्रा.जयंत गायकवाड, सुनील शिंदे, विशाल कांबळे, संजय जगताप, विशाल गायकवाड, अँड. संदीप पाखरे, विजय गायकवाड, महेश भोसले, पोपटराव जाधव, रवींद्र कांबळे, प्रा. जाधव सर, सिद्धार्थ आढाव, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, समीर भिंगारदिवे, शिवाजी भोसले, नगरसेवक विजय गव्हाळे, शिवाजी साळवे, नितीन कसबेकर, गौतमीताई भिंगारदिवे, बाळासाहेब निकम, संजय साळवे, अंकुश मोहिते, सागर ठोकळ, पप्पू पाटील, सागर विधाते, भीम वाघचौरे, सुजन भिंगारदिवे, दीपक लोंढे, सिद्धांत गायकवाड, गणेश गायकवाड, शांतवन साळवे, दया गजभिये, निखिल सूर्यवंशी, शैनेश्वर पवार, रुपेश शेलार, सुभाष वाघमारे, रुपेश लोखंडे, वैभव आवटे, बापू पाचारणे, अक्षय बोरुडे, प्रकाश वाघमारे, दीपक सरोदे, ऋषी विधाते, दीपक साळवे, येशुदास वाघमारे, प्रवीण कांबळे, ऋषी कराळे, मंगेश मोकळ , दीपक गरुड आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सर्व समाज बांधवांनी आपापले विविध मत व्यक्त करून एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला व 27 जुलै 1978 रोजी महाराष्ट्राच्या विधिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरांचा ठराव झाला होता त्याच दिवसाचे औचित्य साधून येणाऱ्या 27 जुलैला ऐतिहासिक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या थाटात होणार असल्याचे सांगितले व यावेळी आंबेडकरी चळवळी मधील नेते मंडळी प्रमुख पाहुणे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.


