Tuesday, November 11, 2025

राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यास भाजपला आव्हान !प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजपकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी भेट देखील घेतली होती. मात्र, यानंतर मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी अस्मितेसाठी तब्बल 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले. यानंतर आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आता यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भाष्य केले आहे.

रवींद्र चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि आमची टीम ही संपूर्ण ताकदीने संघटनात्मक दृष्ट्या मजबूत कशी होईल? या दृष्टिकोनातून अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. या संघटन पर्वात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात भाजपचे विचारधारा जी राष्ट्रीयत्वाला धरून आहे, ती पोहोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही केलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी जे काही आवश्यक आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा असल्याने भाजप आता राज ठाकरेंसोबतचा मैत्रीचा हात मागे घेणार का? असे विचारले असता रवींद्र चव्हाण म्हणाले की, राजकारणात काय कधी होईल? याची कल्पना नाही नसते. ठाकरेंचा विजयी मेळावा झाला आणि दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी दिलेले स्टेटमेंट होते की, कार्यकर्त्यांनी युतीच्या संदर्भात काहीही चर्चा करू नये. त्यामुळे प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक संघटना येणाऱ्या निवडणुकांकडे अत्यंत सावधपणे पाऊल टाकत असल्याचे त्यांनी म्हटले. रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, राज ठाकरे हे अतिशय समजदार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मुंबईच्या दृष्टिकोनातून जे जनतेचं हित आहे, त्या दृष्टिकोनातून दोघेही पावले उचलतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles