बुरुडगावची लाईट गुल, गाव अक्षरशा ३ दिवसापासून अंधारात, नागरिक त्रस्त…
केडगाव, अंबिकानगर, भूषण नगर मधील लाईट १८ तासापासून गायब
आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता रमेश पवार त्यांच्या कार्यालयात ग्रामस्थांचे आंदोलन
अहिल्यानगर : जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हाहाकार उडविला असल्यामुळे ठीक-ठिकाणी झाडे कोसळून विद्युत तारा तुटल्या असल्यामुळे बुरुडगावची लाईट ३ दिवसापासून गुल झाली आहे. त्यामुळे संपूर्ण गावात अंधार पसरला आहे. नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहे. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तसेच केडगाव, अंबिकानगर, भूषण नगर परिसरातील लाईट गेल्या १८ तासापासून गेली आहे. या प्रश्नासंदर्भात नागरिकांनी थेट आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण, उप अभियंता राहींज कुमावत यांच्याशी संपर्क साधून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या यावेळी. बुरुडगाव केडगाव मधील ग्रामस्थांनी अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत आंदोलन सुरु केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महेंन्द्र उपाध्ये, दिनेश शेळके, अमित जाधव, सोमा तांबे, माउली जाधव, बापू औताडे, राजू जाधव, तेजस साबळे, रवीन्द्र शिंदे, राहुल वाघ, सोनू साबळे, सिद्धू गायकवाड, माऊली गायकवाड, पप्पु जाधव, विशाल बोरगे व बुरुडगांव येथील ग्रामस्थ व केडगांव येथील नागरीक उपस्थित होते.
(चौकट) बुरुडगाव, केडगाव मधील लाईट गेल्या ३ दिवसापासून गेली असल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांची ग्रामस्थांच्या वतीने भेट घेतली असून, पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. वादळी वाऱ्यामुळे तारा तुटल्या जातात, व २ ते ३ दिवस लाईट गेली जाते. त्यामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. लाईट गेल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे. तरी या पुढील काळात विद्युत विभागाने अलर्ट राहून विद्युत प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे. यावेळी अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी बुरुडगाव, केडगाव परिसरातील लाईटचा प्रश्न २० मिनिटात मार्गी लागला जाईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी दिली


