नगर शहरात व्यावसायिकावर हल्ला ; हवेत गोळीबार धारदार शस्त्राने केले वार

अहिल्यानगर -सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता परिसरात रविवारी (24 मे) सकाळी एका व्यावसायिकावर चार अनोळखी हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात व्यावसायिक चिरंजीव गाढवे (वय 31, रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोरांनी पळून जाताना हवेत गोळीबार केल्याचे गाढवे यांचे म्हणणे असून पोलिसांना घटनास्थळी निकामी काडतूस आढळून आली आहे.याबाबत गाढवे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गाढवे यांची एमआयडीसी निंबळक बायपास परिसरात मनोहर इंजिनियरिंग नावाची कंपनी आहे. ते आपल्या मित्रासोबत रविवारी सकाळी चहा-नाश्त्यासाठी बाहेर गेले होते. सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास गाढवे व त्यांचे मित्र राजू काळे हे पाईपलाईन रस्त्यावरील तुळजा भवानी मंदिराशेजारी असलेल्या पुणेरी चहा या दुकानात गेले होते. गाढवे हे पाणी बाटली घेण्यासाठी काउंटरजवळ उभे असताना अचानक त्यांच्या पाठीमागून आलेल्या तीन ते चार अनोळखी इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. यातील एका हल्लेखोराने धारदार शस्त्राने गाढवे यांच्या पाठीवर वार केला.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गाढवे घाबरून दुकानाच्या आतमध्ये पळाले. त्यानंतर सर्व हल्लेखोर दुकानात घुसले. त्यांच्या चेहर्‍यावर मास्क बांधलेले होते. हल्लेखोरांनी तु आमच्या पप्पू शेठचं, गौरव भाऊचं नाव गुन्ह्यात घेतो का? असे म्हणत धारदार शस्त्रे, लोखंडी वस्तू तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी गाढवे यांनी हॉटेलमधील टेबल संशयितांकडे फेकल्याचेही जबाबात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, गाढवे यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा होऊ लागले. त्यामुळे संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.

पळताना त्यातील एका संशयिताने कमरेतील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला असल्याचेही जबाबात नमदू आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शहर उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, निरीक्षक जगदीश भांबळ यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक टिमला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी निकामी झालेले काडतुस आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे. निरीक्षक भांबळ अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles