Saturday, February 21, 2026

नगर तालुक्यात 200 खाटांचे कामगार रुग्णालय मंजूर, मंत्रिमंडळाने दिली मान्यता

अहिल्यानगर -जिल्ह्यात राज्य कामगार विमा महामंडळाच्या ईएसआयसी (कर्मचारी राज्य विमा कार्ड) कार्डधारक कामगारांसाठी दोनशे खाटांचे विमा कामगार रुग्णालय उभारणीला जागा देण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. दरम्यान, महसूल विभागाने प्रस्ताव दिलेल्या इसळक येथील जागेची पाहणी राज्य शासनाच्या पथकाने केली होती. आता त्याच ठिकाणी हे कामगार रुग्णालय उभारण की अन्य ठिकाणी जागेची नव्याने पाहणी होणार याबाबत जिल्हा महसूल विभागाकडून स्पष्टता होवू शकली नाही.

जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढत असल्याने कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा कामगार रुग्णालयात आयसीयू व डमिटची सुविधा नाही. त्यामुळे ईएसआयसी (कर्मचारी राज्य विमा कार्ड) कार्डधारक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. आता 200 खाटांचे कामगार रुग्णालय सर्व सुविधायुक्त उभारले जाणार आहे. जिल्ह्यात 45 हजारांहून अधिक ईएसआयसी कार्डधारक कर्मचारी आहेत. त्यांना केंद्र सरकारचे एमआयडीसी येथे नवनागापूर व राज्य सरकारच्या शहरातील सावेडी येथील कामगार रुग्णालयात प्राथमिक उपचार दिले जातात; परंतु गंभीर आजार असल्यास त्यांना खासगी रुग्णालयात अ‍ॅडमिट व्हावे लागते.

ईएसआयसी कार्डधारक कामगारांसाठी 200 खाटांचे विमा कामगार रुग्णालय काही वर्षांपूर्वी मंजूर झाले होते; परंतु जागा निश्चित नसल्याने रुग्णालय रखडले. काही दिवसांपूर्वी या रुग्णालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी राज्य शासनाचे एक पथक जिल्ह्यात आले होते. इसळक (ता. नगर) येथील जागेचा प्रस्ताव महसूल विभागाने दिला होता. यानंतर महसूल विभागाने वनविभाग, सामाजिक बांधकामसह इतर विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्र मागविले होते. आता शासनाने रुग्णालय उभारणीसाठी जागा देण्याचा शासन आदेश काढला आहे; परंतु मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे आदेशाचे अधिकृत पत्र प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे कोणत्या जागेला मान्यता मिळाली हे अद्याप स्पष्ट नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles