नगर शहरातील चांदणी चौकाचे महर्षी वाल्मीक महाराज चौक नामकरण !महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

शहरातील चांदणी चौकाचे महर्षी वाल्मीक महाराज चौक असे नामकरण करा

अखिल भारतीय वाल्मीक समाज संघटनेची महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

अहिल्यानगर : शहरातील चांदणी चौक हे अधिकृत नाव नसून याला कुठलाही इतिहास नाही हा राष्ट्रीय महामार्ग असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या चौकाचे नामांतर करून महर्षी वाल्मीक महाराज चौक असे नामकरण करावे, मुघलांनी आपली मंदिरे तोडली आणि अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांची उभारणी केली आहे, त्यांचे नाव आपल्या जिल्ह्याला देण्यात आले असून आयुक्तांनी तातडीने महासभा बोलून चांदणी चौकाच्या नामांतराचा विषय मंजूर करावा अशी मागणी अखिल भारतीय वाल्मीक समाज संघटनेने निवेदनाद्वारे महापालिकेच्या आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहिल्यानगर शहरातील चांदणी चौकाला महर्षी वाल्मिक महाराज चौक असे नामकरण करावे अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय वाल्मीक समाज संघटनेच्या वतीने आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केले यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा सचिव अर्जुन चव्हाण, जिल्हा सचिव संतोष सारसर, जिल्हा उपसचिव पापा चोहान महाराज, जिल्हा उपसचिव संदीप लखन, नगर शहर अध्यक्ष रोहन चावरे,अजय सौदे, अनिल तेजी, अनिल वाणे, रविंद्र मोरकरोसे, राजेश चव्हाण, अनिल मटू,राजेश बैद, अभिषेक भगवाने,राजु चव्हाण, संदिप करोलिया, कुणाल बैद,आकाश कुडीया,नरेश चव्हाण, रोहित बागडी, शुभम लोट आदी उपस्थित होते
निवेदनात पुढे नमूद केले की, आपल्या अहिल्यानगर शहरातील चांदणी चौकाचे नाव बदलून महर्षी वाल्मिकी चौक नामकरण करण्यात येवून महर्षी वाल्मिक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. महर्षी वाल्मिकी महाराज यांचा जीवन प्रवास आपल्या सर्वासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, त्यांचा जीवन प्रवास, कार्य, वाडमय आहे. त्यांची माहिती आपल्या पुढच्या पिढीसाठी पोहचविणे हे आपले कर्तव्य आहे. या करिता “चांदणी चौकाचे” नाव बदलून “महर्षी वाल्मिकी चौक” करून त्या ठिकाणी पाटीचे व पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी समस्त अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटना व अहिल्यानगर जिल्ह्यातील समस्त मेहतर-वाल्मिकी समाज बांधवानी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles