Sunday, February 22, 2026

मोठी दुर्घटना टळली…पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

भाजप नेत्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पंकजा मुंडे या लातूरमध्ये प्रचारसभेसाठी जात होत्या.

मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज पंकजा मुंडे या लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. या प्रचारसभेचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या प्रचारसभेसाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने आकाशात झेपावणार इतक्यात त्यांच्या हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले.

यामुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील नियोजित सभांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असून, त्या थोड्याच वेळात लातूरकडे रवाना होतील, अशी माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी पक्षाअंतर्गत राजकारणामुळेच अजित पवार यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली; नगरमधील माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles