Shirdi शिर्डी येथील साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीच्या झीज होण्याबाबत गेल्या काही काळापासून विविध चर्चा रंगत होत्या. या पार्श्वभूमीवर मूर्तीच्या संवर्धनासाठी आणि सद्यस्थिती तपासण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आपला सविस्तर अहवाल सादर केला आहे. साईबाबांची मूर्ती पूर्णपणे सुरक्षित असून तिला कोणताही धोका नाही, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
मुंबईच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील तज्ज्ञ समितीने शिर्डीत येऊन मूर्तीची अत्यंत सूक्ष्म आणि तांत्रिक पाहणी केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. शिर्डीत साईबाबांची ही भव्य मूर्ती उच्च दर्जाच्या इटालियन मार्बलमध्ये साकारलेली आहे. हा दगड अत्यंत कठीण आणि टिकाऊ असल्याने नैसर्गिकरीत्या त्याची झीज होण्याची प्रक्रिया अत्यंत संथ असते. त्यामुळे ही मूर्ती पुढील अनेक दशके तशीच राहील, असे त्यांनी या अहवालात नमूद केले आहे.
Yamaha पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरची एंट्री…जसह सर्वच फीचर्स जबरदस्त
मूर्तीचे पावित्र्य आणि चकाकी कायम राखण्यासाठी तज्ज्ञांनी साईबाबा संस्थानला महत्त्वाचे बदल सुचवले आहेत.
*स्नानासाठी वापरले जाणारे पाणी ‘सॉफ्ट वॉटर’ असावे. पाण्यातील क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास मूर्तीच्या रंध्रांमध्ये क्षार साचून मूर्ती निस्तेज दिसू शकते.
गाभाऱ्यातील प्रकाश व्यवस्था ही उष्णता निर्माण करणारी नसावी. ‘कोल्ड एलईडी’ दिव्यांचा वापर करून मूर्तीवर थेट उष्णता पडणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
दररोज पहाटे होणाऱ्या मंगलस्नानावेळी कोणत्याही रासायनिक द्रव्याचा किंवा साबणयुक्त पदार्थांचा वापर पूर्णपणे बंद करावा.


