शरद पवारांचा पक्ष फूटणार की सत्तेत सामील होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला सर्व प्लॅन

शरद पवार गटाची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांवर आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. ठाकरे यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर आता खासदार शरद पवार यांच्याही पक्षात फूट पडणार असल्याचा दावा केला जातोय. लवकरच शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याचीही शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत. या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार की नाही, हे थेट सांगून टाकलं. दरम्यान देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी काही राजकीय भेटीदेखील घेतल्याचं सांगितलं जातंय. या दिल्ली दौऱ्यादरम्यान फडणवीस यांना शरद पवार यांच्या पक्षाबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. ही एक पेरलेली बातमी आहे. यात कुठलेही तथ्य नाहीये. महाराष्ट्रात एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं. महाराष्ट्रातून एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाहीये. आम्ही आमच्यासोबत कोणालाही जोडणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच पवार यांचे आमदार किंवा खासदारही भविष्यात आम्ही फोडणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles