Tuesday, March 17, 2026

प्रेमीयुगुलाची विष प्राशन करुन आत्महत्या ,अहिल्यानगरच्या तरूणाचा समावेश

पूणे – खडकवासला धरणाजवळ एका प्रेमी युगुलाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाचे तीन वर्षांपासून प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांनी सुरु केला आहे.आज (११ जुलै) पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलामध्ये एक तरुण आणि एक तरुणी असे दोन मृतदेह आढळले होते. याबाबतची माहिती मिळताच उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती वानवडी पोलिसांना कळवली. तपासामधून दोघांनी विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीच्या बहिणीने पोलिसात फिर्याद दिली होती. काल (१० जुलै) दुपारी फिर्यादी हीने तिच्या १६ वर्षीय बहिणीला क्लाससाठी सोडले होते. पण क्लास संपल्यानंतर बहीण परत न आल्याने फिर्यादीने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी एका संशयित मुलाचा देखील तपास करण्यास सुरुवात केली.पोलीस ज्या संशयित तरुणाचा शोध घेत होते, तो अल्पवयीन तरुणीचा प्रियकर असल्याचे समोर आले.

तो तरुण मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, मात्र त्याचा मोबाईल फोन बंद होता. आज खडकवासला धरणाजवळ अल्पवयीन तरुणीसह तिच्या प्रियकराचा मृतदेह देखील आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles