एमआयएमचा निवडणूकी संदर्भात जिल्हा मेळावा संपन्न
विरोधकांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ – समीर साजीद बिल्डर
नगर – महाराष्ट्रात एम आय एम पक्षाला बळकट करण्यासाठी राज्याची कोर कमेटीने राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाने महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. पश्चिम महाराष्ट्राची सुरवात नगर येथून करण्यात आली. नगर येथे ही जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर, अतिक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी, सह सचिव शाफीउल्ला काझी, सह सचिव सैफ पठाण यांनी आढावा बैठकित जिल्ह्यात होणाऱ्या निवडणूका कश्या आणि कोणत्या प्रकारे लढवता येईल यावर चर्चा केली.
नगर जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी नगरची माहिती देत असतांना सांगितले की अहमदनगर मध्ये जेव्हा आम्ही एम आय एम चे काम सुरु केले तेव्हा लोक कोणताही प्रतिसाद देत नव्हते.परंतु आज चांगल्या चांगल्या नेते आणि आजी माजी लोक प्रतिनिधी एम आय एम सोबत येण्यास तयार आहे. लवकरच तुम्हाला चांगली बातमी देणार असल्याचेही पक्ष श्रेष्ठींना सांगितले. येणाऱ्या महानगर पालिका निवडणूक असो की जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असो एम आय एम आपल्या हिस्स्याचे लोक प्रतिनिधी निवडून आणतील.
प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर यांनी सांगितले की आम्ही नगर पासून जवळ आहे. आम्हाला माहित आहे की स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाबद्दल काही अपशब्द वापरले आहे.त्यांना मुस्लीम समाजाचे दर्गा मस्जिद आणि जमीन यांच्यावर कब्जा करायचा आहे. काळजी करू नका विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता फक्त एम आय एम मध्ये असून लवकरच त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यात येईल. महानगर पालिकेत एम आय एम चे उमेदवार निवडून द्या. विकास काय असतो आणि कसा करायचा असतो हे जनतेला दाखून देऊ.
प्रदेश महासचिव अतिक अहमद मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की पक्ष बळकट करण्यासाठी आपल्याला सर्व समाजाला ज्यांच्यावर अत्यचार करण्यात आले आहे त्यांना एकत्र घेऊन सत्तेत भागीदारी घ्यावी लागेल. येणारा काळ एम आय एम साठी सुवर्णकाळ असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी ते एम आय एम सोबत कसे जुडले आणि कसे विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला यावर भाष्य केले. तर सैफ पठाण यांनी सांगितले की मी एम आय एम सोबत एक कार्यकर्ता या नात्याने जुड्लो आणि समाजाचे काम करत गेलो. माझ्या कामाची विरोधकांनी इतकी धास्ती घेतली की मला खोट्या गुन्ह्यात अडकून तुरुंगात टाकले.परंतु आज खासदार ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन प्रदेश सहसचिव पदाची जबाबदारी दिली. आणि मला पूर्ण महाराष्ट्रात पक्ष बळकट करण्यासाठी सांगितल्याने मी आज तुमच्या सोबत असल्याचे नमूद केले.
सहसचिव शफीउल्ला काझी यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की जो पक्षासाठी निष्ठावंत आहे पक्ष त्याच्या सोबत खंबीरपणे उभा राहणार. कोणीही पक्ष विरोधी कारवाई केली तर त्याला पक्षात कोणतेही स्थान नसणार. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ शेख, युवा अध्यक्ष अमीर खान, शेवगाव अध्यक्ष युसुफ शेख, कर्जत अध्यक्ष डॉ अन्सार, श्रीरामपूर शहर अध्यक्ष शहाबाज शेख, सरफराज सय्यद, इम्रान देशमुख, इस्माईल शेख, शम्स शेख, नासीर शेख, आवेज शेख, नदीम तांबोळी, शोएब पठाण, सज्जाद शेख आदी उपस्थिती होते.
येणारया काळात एम आय एम ची सत्ता स्थापनेसाठी महत्वाची भूमिका असणार असल्याची चर्चा सर्वत्र होत असल्याने एम आय एम मुळे किधर ख़ुशी किधर गम असण्याची शक्याता आहे.


