Crime News : बनावट इन्स्टाग्राम अकाउंटवरून महिलेची बदनामी ;फोटो वापरून अश्लिल मेसेज

अहिल्यानगर-सोशल मीडियाचा वापर करून महिलांची बदनामी करण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसून, असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. शेवगाव तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 30 वर्षीय महिलेचे फोटो चोरून, तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आले. इतकेच नाही, तर त्यावरून अश्लिल मेसेजसह तिचा वैयक्तिक मोबाईल नंबर प्रसारित केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी, पीडित महिलेच्या फिर्यादीवरून येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरूध्द बुधवारी (12 नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या पूर्वी, अज्ञात आरोपीने मोबाईल क्रमांकचा वापर करून, पीडित महिलेच्या नावाने एक बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडले. आरोपीने या बनावट अकाउंटवर फिर्यादी महिलेचे फोटो वापरले. तसेच, अश्लिल मेसेज पोस्ट केले. आरोपीने या बनावट प्रोफाईलवर अश्लिल शब्दप्रयोग करून, त्याखाली पीडित महिलेचा खरा मोबाईल क्रमांक टाकला. हा सर्व प्रकार पीडित महिला व त्यांच्या कुटुंबाची समाजात बदनामी करण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घडलेल्या प्रकार पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम 356 (2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (सी) आणि 67 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles