‘सह्याद्री मल्टीसिटी’चा संचालक फुंदे अटकेत; एक कोटीपेक्षा जास्त रक्कम बँकेतून काढल्याचा आरोप

अहिल्यानगर -गुंतवणूकदारांची फसवणूक करणार्‍या सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला संचालक नीलेश शिवाजी फुंदे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) याला अटक केली आहे. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची (18 मेपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे.

दरम्यान, यासंदर्भात लेखापरीक्षकांनी सादर केलेल्या फॉरेन्सिक अहवालातून या घोटाळ्याचे धक्कादायक धागेदोरे समोर आले आहेत. फुंदे हा या समूहाच्या 26 पैकी नऊ कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत होता. त्याने कंपनीच्या बँक खात्यातून सुमारे 37 लाख रूपये स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळवून घेतले. यामध्ये बँक दोन बँकेतील व्यवहारांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर, संशयित आरोपीने वर्षभरात एक कोटी रूपयांहून अधिक रोख रक्कम बँकेतून काढल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे.

या घोटाळ्यात संस्थापक चेअरमन संदीप सुधाकर थोरात आणि इतर संचालकांनी संगणमत करून ठेवीदारांच्या कष्टाचे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. गुंतवणुकीच्या विविध योजनांचे आमिष दाखवून जमा केलेली रक्कम इतर बँकेत वळविण्यात आली होती. यासंदर्भात दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी चेअरमन संदीप थोरात व मॅनेजर दिलीप कोरडे यांना यापूर्वीच अटक केली असून त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्यात 14 संशयित निष्पन्न झाले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles