आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
अहिल्यानगर: आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सनी वागस्कर व मित्र परिवाराच्या वतीने तपोवन रोडवरील बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, प्रकाश भागानगरे, महेश तवले, निलेश बांगरे, सनी वागस्कर ,डॉ. सुनील भगत, अशोक काळे, अभिराज वागस्कर,अभिषेक घटमाळ, राहुल गिल्डा, वैभव गांधी, सुभाष चौभे, राहुल बुरा, भागवत कुरधने, संतोष लांडे, संतोष ढाकणे, सागर गुंजाळ,तसेच बालघर प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात सनी वागस्कर म्हणाले, “आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम राबवावा, असा संकल्प केला.त्यानुसार गरजू, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.” आमदार संग्राम जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर आभार अभिषेक घटमाळ यांनी मानले.


