शेवगाव आगाराच्या महिला बस वाहकाला बसमध्ये मारहाण, प्रकरणी गुन्हा दाखल

शेवगाव आगाराच्या एका महिला बस वाहकाला तिसगाव (ता. पाथर्डी) येथे बसमध्ये मारहाण करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी घडली घटना
सदर महिला वाहक सोमवार, दि. 1 जून रोजी शेवगाव ते अहिल्यानगर मार्गावरील बसवर कर्तव्य बजावत होत्या. सायंकाळी तिसगाव बसस्थानकावर बस थांबली असताना काही प्रवासी उतरले व काही नवे प्रवासी चढले. त्यावेळी मागून वाहने येत असल्याने बसचा दरवाजा ओढताना एका प्रवाशाच्या बोटाला दरवाजा लागला.

शिवीगाळ, मारहाण आणि मंगळसूत्र हिसकावले
याचा राग आल्याने संबंधित प्रवासी शिवीगाळ करू लागला. महिला वाहकाने त्यास जाब विचारला असता त्याने दमदाटी सुरू केली. त्यानंतर आरोपीने विनयभंग करून मारहाण केली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीने महिला वाहकाच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्रही तुटून हिसकावले.

दरम्यान, आरोपीसोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनीही शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. महिला वाहकाच्या मदतीला आलेल्या बसचालकासह आरोपी व त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा
घटनेची माहिती मिळताच एसटी को-ऑप बँकेचे संचालक दत्तात्रय खेडकर, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अंबादास शिरसाट, सचिव बाळासाहेब सोनटक्के यांनी पीडित महिला वाहकाची भेट घेऊन धीर दिला. आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे केली.

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला 24 तासांत अटक न झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles