श्रीपाद छिंदम १२ तासांसाठी तडीपार
शिवजयंती उत्सव काळात अहिल्यानगरमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना १२ तासांसाठी तडीपार करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यभर वातावरण तापले होते. त्यावर छिंदम यांच्यावर विविध प्रकारे कडक कारवाई झाली होती.
त्य़ानंतर आता यावर्षी तिथीनुसार येणारी शिवजयंती साजरी करण्यासाठी छिंदम यांनी जोरदार तयारी केली होती. दिल्लीगेट येथे भव्य देखावा अन्य तयारी केली होती. मात्र, काही शिवप्रेमी संघटनांनी याला विरोध केला होता. त्यामुळे काही वाद उदभवू नये, यासाठी छिंदम यांना आजच्या दिवशी बारा तासांसाठी शहराबाहेर पाठविण्यात आले आहे, तोफखाना पोलिसांनी यासंबंधीच्या कारवाई आदेशाची अंमलबजावणी केली आहे.
नगरमध्ये शिवजयंती उत्सव काळात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम तडीपार
- Advertisement -


