Tuesday, March 24, 2026

कर्जत मध्ये सभापती राम शिंदे यांना धक्का ; प्रवीण घुलेंचा भाजपला राम राम हाती धनुष्यबाण

कर्जत : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण घुले यांनी सोमवारी (दि. २३)भाजपला राम राम ठोकत, शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कर्जतच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत प्रवीण
घुले यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. घुले यांचा शिवसेनाप्रवेश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. आमदार रोहित पवार यांच्या गटाच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतीमध्ये सत्तांतर घडविण्यात
घुले यांचा मोठा वाटा होता.

सायंकाळी भाजपला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष असताना घुले यांनी ११ मार्च २०२३ रोजी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर शिंदे यांनी घुले यांना हाती घेत बाजार समितीसह नगरपंचायतीत सत्तांतर घडवले. मात्र,सोमवारी अचानक घुले समर्थकांनी सोशल मीडियावर ‘जय महाराष्ट्र’ स्टेटस ठेवत स्थानिक राजकारणात बदलाचे संकेत दिले.रात्री साडेआठ वाजता घुले यांनी मुंबईला जाऊन हाती धनुष्यबाण घेतले.राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. घुले यांच्यापक्षांतरामुळे कर्जत नगरपंचायतीत नगराध्यक्षांचे पतीही सेनेत भाजपच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांचे पती सचिन घुले यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने कर्जत नगरपंचायतीच्या सत्ता समीकरणात बदल घडणार का? असा प्रश्न उभा राहिला आहे. नगराध्यक्षा

घुले भाजपात राहणार की शिवसेनेत जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.कर्जत नगरपंचायतीमध्ये पदाधिकारी बदलाचे वारे वाहत असताना, घुले यांच्या निर्णयाने शिंदे गटात चुळबूळ वाढली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles