Friday, October 31, 2025

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश प्रभारी पदी माजी आमदार लहू कानडे

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश प्रभारी पदी माजी आमदार लहू कानडे
नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रा.सुनील मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकीमध्ये माजी आमदार लहू कानडे उपस्थित होते तर त्यांची राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश प्रभारी पदी एकमताने निवड करण्यात आलीअसून या निवडीबद्दल अहिल्यानगर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी माजी आमदार लहू कानडे यांचा सत्कार करण्यात आला यावेली अंकुश मोहिते, पप्पू पाटील, सिद्धार्थ आढाव, समीर भिंगारदिवे, सतीश साळवे आदीसह सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे म्हणाले की, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे संघटन मजबूत करण्यासाठी माजी आमदार लहू कानडे यांना प्रदेश प्रभारी पदी निवड करण्यात आली तसेच सत्काराला उत्तर देत माजी आमदार लहू कानडे म्हणाले की, पक्षाने जी प्रदेश प्रभारी पदी जबाबदारी टाकली आहे ती पक्षाचे ध्येय धोरण प्रमाणे कार्य करून पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याची भावना व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles