नगरसेवक योगीराज गाडे यांच्या पुढाकाराने सावेडी उपनगरात मोफत आरोग्य शिबिर
अहिल्यानगर, दि. १६ नोव्हेंबर २०२५
नगरसेवक मा. योगीराज शशिकांत गाडे यांच्या पुढाकाराने आणि साईमाऊली हॉस्पिटल तसेच अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त सहकार्याने सावेडी उपनगरात भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आनंद विद्यालय, गुलमोहर रोड, अहिल्यानगर शहर येथे आयोजित केले जाणार आहे.
या शिबिरात खालील सर्व सेवा नागरिकांना पूर्णपणे मोफत मिळणार आहेत—
नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप
मोतीबिंदू शस्त्रक्रिया
गुडघेदुखी व सांधेदुखी तपासणी व निदान
सर्व रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार
ही सुविधा अहिल्यानगर वॉर्ड क्र. ३ तसेच संपूर्ण सावेडी उपनगरातील नागरिकांसाठी खुली आहे.
या उपक्रमाचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन नगरसेवक मा. योगीराज गाडे यांनी केले आहे.
आपल्या निवेदनात नगरसेवक गाडे म्हणाले —
“सामान्य नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण आणि त्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरेल.”
शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व तपासण्या व आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत.
आयोजक:
मा. योगीराज शशिकांत गाडे
नगरसेवक, म.न.पा. अहिल्यानगर
सहकार्य:
साईमाऊली हॉस्पिटल व अंजली चष्मावाला
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: ९६८९८९६९८२


