गौतमीच्या वाहनाच्या अपघातापूर्वी वाहनातून 2 व्यक्ती खाली उतरल्याचे व्हिडिओ दिसतयं. त्यात चालकाच्या शेजारील आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती अपघात स्थळापासून काही अंतरावर आधीच खाली उतरल्याचे स्पष्ट होतयं. विशेष म्हणजे, पेट्रोल पंपापासून काही अंतरावरच गौतमीच्या चालकाने रिक्षाला धडक दिल्यानं रिक्षा चालक जखमी झाला होता…त्यामुळे गाडीच्या पाठीमागे आणखी कोणी होते का? याचा तपास सुरू आहे.
दुसरीकडे गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणात पोलिसांना वाहन चालकांचा मेडिकल रिपोर्ट मिळालाय. ससून रुग्णालयाच्या रिपोर्टमध्ये गौतमी पाटीलच्या चालकाने मद्यपान केलेले नाही, असं नमूद करण्यात आलंय. चालकाच्या तपासणीवेळी तोंडावाटे मद्याचा वास येत नव्हता..चालक मद्यधुंद असल्याचं कोणतचं लक्षण दिसत नव्हतं, असं ही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलयं…त्यामुळे मग आता हा अपघात नेमका घडला कसा? यात चूक तरी कुणाची असे सवाल समोर उपस्थित केला जातोय….


