Saturday, November 15, 2025

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; अहिल्यानगर जिल्ह्यात चुलत्याकडून पुतणीचा खून…

अहिल्यानगर : जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोक्यात दगड घालून खून करण्यातआल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुयातील राळेगण थेरपाळजवळील माजमपूरमध्ये ही घटना घडली. १ जुलै रोजी रात्री हा थरार घडला असून जुन्या रागातून चुलत्यानेच हा खून केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. प्रतीक्षा रितेश भोसले असे मृत मुलीचे नाव आहे. आशिष उर्फ आबड्या ठुब्या भोसले व उर्कुलस जलद्या काळे (रा. खरातवाडी, बेलवंडी, ता. श्रीगोंदा) असे संशयित आरोपींची नावे आहेत.

धकाकदायक म्हणजे आरोपी आशिष उर्फ आबड्या ठुब्या भोसले हा मृत मुलीचा चुलता तरउर्कुलस जलद्या काळे हा मुलीचा आजोबा आहे. परंतु नात्यालाच काळिमा फासणारी घटना घडल्याने तालुयात खळबळ उडाली आहे. या संबंधीची फिर्याद बुधवारी रितेश ठुब्या उर्फ सुभाष भोसले (वय ३५, रा. माजमपूर, राळेगण थेरपाळ, ता.पारनेर) यांनी पारनेर पोलिसांत दिली. पोलिसांनी आशिष उर्फ आबड्या ठुब्या भोसले व उर्कुलस जलद्या काळे (रा. खरातवाडी, बेलवंडी, ता. श्रीगोंदा) या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील फिर्यादी रितेश भोसले यांचा भाऊ आशिष उर्फ आबड्या ठुब्या भोसले यांची मुलगी अस्मिता आशिष भोसले एक महिन्यापूर्वी तळ्यातील पाण्यात पडून मयत झाली होती. त्यामुळे आशिष भोसले व त्याचा सासरा उर्कुलस जलद्या काळे यांनी फिर्यादी यांची मुलगी प्रतीक्षा हिच्यामुळेच आमच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला याचा राग मनात धरून मंगळवारी प्रतीक्षा भोसले हिच्या डोयात दगड घालून ठार मारले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती व निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles