सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे.आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १८,६०० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. सोन्याचे दर जरी घसरले असले तरी चांदीने मात्र भाव खाल्ला आहे. चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या…
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,८६० रुपयांनी कमी झाले आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,२२,२९० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १८,६०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,२२,९०० रुपये खर्च लागणार आहेत. त्यामुळे गुंतवणूक म्हणून आज २४ कॅरेटचे सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
सोन्याचे दागिने हे २२ कॅरेटमध्ये बनवले जातात. त्यामुळे आज हे सोन्याचे दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,७०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१२,१०० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दरामध्ये तब्बल १७,००० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,२१,००० रुपये मोजावे लागणार आहेत.
त्याचसोबत, आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घसरण झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,३९० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९१,७२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १३,९०० रुपयांनी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,१७,२०० रुपये मोजावे लागतील.
यासोबत आज चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. एक ग्रॅम चांदीच्या दरामध्ये ३ रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी १७० रुपये खर्च करावे लागतील. तर आज एक किलो चांदीच्या दरामध्ये ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज या चांदीची किंमत १,७०,००० रुपये इतकी झाली आहे.


