Gold-Price: सोनं पुन्हा झालं स्वस्त!; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सलग तीन दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय. आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरले असल्याचे पाहायला मिळाले. २४ कॅरेट १ तोळं किमतींत २,८९० रुपयांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र चांदीच्या किंमतीत कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही. सण-वारांच्या कालावधीत सोन्याचे दर घसरताना दिसत आहेत. याचा सर्वसामान्यांना नक्कीच फायदा होणार आहे. कारण बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २९ ऑगस्ट २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १५६,८२० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १४३,७५२ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २३७,८८० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,४७५ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १४३,४९५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १५६,५४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १४३,४९५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १५६,५४० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १४३,४९५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १५६,५४० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १४३,४९५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १५६,५४० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles