Gold-Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मंगळवारी थोडी उसळी घेतली होती. पण आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. प्रति तोळा सोन्याचे दर २ हजारांपेक्षा जास्त घसरले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.ऐन खरेदीच्या काळात सोन्याचे भाव घसरल्याने सर्वसामान्य ग्राहक आणि दागिने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा सर्वच प्रकारच्या सोन्याच्या दरात प्रचंड कपात झाली आहे.

२४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत आज २२० रुपयांची किरकोळ घसरण झाली. यानंतर १ तोळा सोन्याचा भाव १ लाख ५४ हजार ६९० रुपयांवर आला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर १ लाख ६२ हजार रुपयांच्या पार गेले होते. म्हणजेच आठवड्यात किमती जवळपास ८ हजार रुपयांनी कोसळल्या आहेत. दुसरीकडे चांदीच्या किमतीत २६० रुपयांची किरकोळ वाढ नोंदवली गेली. गेल्या आठवड्यात चंदेरी धातूचा एक किलोचा भाव २ लाख ४५ हजार रुपयांवर गेला होता. दोन्ही धातूंमध्ये घसरण झाल्याने सामान्य खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहर २४ कॅरेट सोनं २२ कॅरेट सोनं
दिल्ली १,५३,७१० १,४०,९०१
मुंबई १,५३,९७० १,४१,१३९
बंगळुरू १,५४,०९० १,४१,२४९
कोलकाता १,५४,६६० १,४०,९५६
हैदराबाद १,५४,२२० १,४१,३६८

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles