Gold-Price: सोन्याच्या दरात मोठा बदल! जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी नागरिकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरज असेल तरच सोने खरेदी करण्याचे आवाहन केले. दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांपासून घसरणाऱ्या सुवर्ण बाजारात आता तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला असून, दरात सातत्याने वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा १ तोळ्याचा भाव १,५५,३५० रुपयांवर पोहोचला आहे. या दरात तब्बल ३,३३० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १० तोळे सोन्याच्या किमतीत ३३,३०० रुपयांची वाढ
झाली आहे.
सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे नागरिकांना घाम फुटला आहे. विशेषतः लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे सोन्याची खरेदी करण्यापूर्वी आजचे २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेटचे ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

शहर २४ कॅरेट सोनं २२ कॅरेट सोनं
दिल्ली १,५०,८२० १,३८,२५२
मुंबई १,५१,०८० १,३८,४९०
बंगळुरू १,५१,२०० १,३८,६००
कोलकाता १,५०,८० १,३८,३०७
हैदराबाद १,५१,३२० १,३८,७१०

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles