Saturday, March 7, 2026

Gold- Price: सोन्याच्या दरात मोठा फेरबदल; जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव

सोनं आणि चांदीच्या दागिन्यांच्या किमतीत चढ उतार पाहायला मिळत आहे. दिवाळीनंतर सध्या सर्वत्र लग्नसराईचा मोसम सुरू आहे. लग्न म्हटलं की सोनं खरेदी आलंच. अशातच सोन्याच्या दरात बदललेले चढ उतारामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. काल सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. मात्र, आज सोन्याच्या दरात कमालीची घट पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात १,७०० रूपयांची घसरण झाली आहे. यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.

आज २० नोव्हेंबर २०२५. आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १७० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं खरेदीसाठी आपल्याला १,२४,६९० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या भावात १,७०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,४६,९०० रूपये मोजावे लागतील.

२४ सह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १५० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१४,३०० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १,५०० रूपयांची घसऱण झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,४३,००० रूपये मोजावे लागतील.

२४ सह २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १२० रूपयांची घट झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९३,५२० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १,२०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,३५,२०० रूपये मोजावे लागतील.

सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदीच्या दरात ३ रूपयांची घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदीसाठी आपल्याला १६५ रूपये मोजावे लागतील. तर, १ किलो चांदीच्या दरात ३,००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदीसाठी आपल्याला १,६५,००० रूपये मोजावे लागतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles