Gold- Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ ;जाणून घेऊया १० ग्रॅम सोन्याचा भाव

सराफा बाजारात सोने-चांदीमध्ये पुन्हा भाववाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचा दरात २५१० रुपयांनी वाढ झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. अमेरिका-इराण युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर पाहायला मिळत आहे. अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात आज शनिवारी पुन्हा भाववाढ झाली आहे. १ तोळ्यामागे सोन्याच्या दरात २५१० वाढ झाली आहे. तर १० तोळ्यामागे २५१०० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १४८०९० रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १३५५७५ रुपयांवर पोहोचला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर १११०७० रुपये इतका झाला आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

२४ कॅरेट सोन्याचा भाव १४९०९ रुपये प्रति ग्रॅम इतका झालाय. मागील दिवसाच्या तुलनेत १ ग्रॅम सोन्याचा दरात २५१ रुपयांनी वाढ ढाली आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १४८०९० रुपये प्रति ग्रॅम इतका झाला आहे. सोन्याचा दर कालच्या तुलनेत २५१० रुपयांनी वाढला आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर

२२ कॅरेट सोन्याचा भाव १३५७५ रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. कालच्या किंमतीत २३० रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव १३५७५० रुपये प्रति ग्रॅम इतका झाला आहे. कालच्या तुलनेत २३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

चांदीच्या दरातही वाढ

सोन्यानंतर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एक किलो चांदीच्या दरात ५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. १ किलो चांदीचा भाव २४५००० इतका झाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles