गेल्या महिन्याभरापासून सुरु असेलेल्या इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत मोठे चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. आखाती देशातील या युद्धाचा थेट परिणाम आता सराफ बाजारात देखील होत आहे. अशातच सोनं आणि चांदीच्या दरात दररोज मोठे बदल होतांनाचे चित्र आहे. चला तर मग आज २ एप्रिल रोजी गुरुवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २ एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५२,९५०० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १४१,८३७ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.


