आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार रॅलींना वेग आला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा स्वतः प्रचार रॅलींमध्ये उतरले आहेत. याचदरम्यान घडलेला एक प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शुक्रवारी धेमाजी येथे निवडणूक प्रचारादरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना एका महिलेने जवळ ओढून त्यांच्या गालावर चुंबन घेतले. नेमकं हेच दृश्य आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये बिहपुरिया येथे महिलांची मोठी गर्दी त्यांना भेटण्यासाठी, गळाभेट घेण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी सरसावलेली दिसली. निवडणूक प्रचारातील एक भावनिक नातं यामुळे अधोरेखित झालं.
या दृश्यावर अनेकांनी टीका केलेली असताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, “आईपासून मुलांपर्यंत आणि वडिलधाऱ्यांपर्यंत प्रत्येकजण माझ्यावर प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करत आहे. जे मला चुंबन घेण्याच्या कृतीतूनही दिसून आलं. या चुंबनामध्ये पवित्रता, एकरुपता आणि प्रेम आहे. हे एका क्षणात मिळत नाही. तर २५ वर्षांच्या तपस्येनंतर मिळतं.”
https://x.com/himantabiswa/status/2037474750277283954?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2037474750277283954%7Ctwgr%5E4d67254106c38863186c2418dc6c282b4440207b%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Fhimanta-biswa-sarma-kiss-video-viral-election-rally-assam-news-reaction-sgk-96-5801889%2F
ते पुढे म्हणाले, “पुराच्या वेळी असो, कोविड काळात असो किंवा मुलांच्या कल्याणाच्या मोहिमांमध्ये असो, मी नेहमीच आघाडीवर राहिलो आहे. राजकारणात तुम्ही सत्या सांगितले तर लोक प्रचंड प्रेम दाखवतात. जर काँग्रेसने विचारले की लोक त्यांचे चुंबन का घेत नाहीत, तर तो माझा दोष नाही.”यापूर्वी ‘जन आशीर्वाद यात्रे’दरम्यान हातावर आलेल्या ओरखड्यांचे वर्णन सरमा यांनी समर्थकांचे “प्रेम आणि आपुलकीच्या खुणा” असे केले होते. आसाममधील महिला मतदारांशी असलेले हे घट्ट नाते भाजप सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांचे फळ मानले जात आहे.


