सराफ व्यावसायिकाला 13 लाख 80 हजाराला गंडा;आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल

जामखेड -येथील सराफ व्यावसायिकाला 13 लाख 80 हजाराचा गंडा घातल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरसह दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून तीन आरोपींपैकी एकास अटक केली. त्याला रविवारी(दि.29) जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमोल विलास चिंतामणी (वय 49, रा. कोर्ट रोड, जामखेड) यांचे वैशाली ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दि. 17 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारास आप्पासाहेब ज्ञानदेव देवकाते (रा. काटेवाडी) हा त्यांच्या दुकानात आला. त्याने आपला मित्र धम्मसागर हिरालाल समुद्र (रा. सारोळा) याने आयसीआयसीआय बँकेत घेतलेले गोल्ड लोन सोडवण्यासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून चिंतामणी यांनी 13 लाख 80 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. मात्र, संबंधित रक्कम परत न करता आरोपींनी फसवणूक केल्याचे समोर आले.

या प्रकरणात आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही) यांनीही संगनमत करून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या गुन्ह्याचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे हे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles