उद्धव ठाकरेंचे 15 आमदार जाणार, रिलस्टार हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ …..

अयोध्येथील श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झालीय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ‘रामरक्षा आंदोलन’करण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत पण मूर्ख नाही आहोत, तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरलं, पण हनुमानाच्या मशालीनं जशी रावणाची लंका जाळली तीच मशाल आज आमच्या हाती असून या मशालीनंच आम्ही अन्यायाची लंका जाळणार, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलंय. अशातच आता रिलस्टार हिंदुस्थानी भाऊ यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन ठाकरेंना एक सल्ला दिला आहे. तसेच, संजय राऊतांना ‘भांडुपचा खोटा अनिल कपूर’, अंस म्हणत टोला लगावला आहे.

बिग बॉस फेम रिलस्टार हिंदुस्थानी भाऊ यानं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरेंना उद्देशून हिंदुस्थानी भाऊनं इशारा दिलाय. तसेच, संजय राऊतांनाही टोले लगावले आहेत. हिंदुस्थानी भाऊ व्हिडीओमध्ये म्हणाला की, “उद्धव साहेब, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, माहितीय ना? मी मध्ये बोललेलो, सांभाळा नाहीतर पंधरा आमदार आणि पंचवीस नगरसेवक जायच्या मागे आहेत… सचिन भाऊ अहिर पहिला बॉम्ब फुटला आणि सप्टेंबरपर्यंत खूप काही जाणार आहे. सप्टेंबर सात तारीख, आठवण ठेवा ही तारीख, खूप काही जाणार आहे” असं हिदुस्थानी भाऊ उद्धव ठाकरेंना म्हणाला.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हिंदुस्थानी भाऊनं संजय राऊत यांचा उल्लेख ‘भांडुपचा खोटा अनिल कपूर’ असा केलाय. तो म्हणालाय की, “तुमचा अनिल कपूर काय बोलतो? आता ‘तुडवा ऑपरेशन’ चालू करणार… ‘तुडवा ऑपरेशन’ चालू करणार? अरे, सचिन भाऊ अहिर कोण आहे? दगडी चाळचं नाव ऐकलंय. ऐकलंय ना? सात रस्ता, दगडी चाळ, अरूण भाई गवळी उर्फ डॅडी… बाळासाहेब काय बोलायचे माहितीय ना? तुमच्याकडे दाऊद आहे, तर आमच्याकडे गवळी आहे… हा तेच ते अरुण भाई गवळी… हा भांडुपचा खोटा अनिल कपूर आहे ना, याला आता तरी तोंड बंद करायला सांगा… नाही तर ह्याचा ‘तुडवा ऑपरेशन’ चालू होईल… जय श्री राम… जय शंभू नारायण…”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles