राज्यातील वेगाने वाढणाऱ्या पुणे शहरात भीषण अपघाताची घटना घडली असून 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शहरातील नवले पुलावर हा अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत 20 जण जखमी झाल्याचे समजते, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रीजवर पोहोचल्या आहेत. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
शहरातील नवले ब्रीजवर सातत्याने अपघाताच्या घटना घडतात, आज पुन्हा एकदा येथे भीषण अपघाताची घटना घडली. 3 ते 4 गाड्यांची धडक बसल्याने हा अपघात झाला असून दोन कंटेनरच्यामध्ये एक कार जळत असल्याचं दिसून आलं. या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होते, अशीही प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर, काही काळासाठी नवले पुलासह रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून सध्या मदत व बचाव कार्य सुरू आहे. नवले पुलावरील हा अपघात इतका भीषण होता की, गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला. त्यामध्ये, 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. सध्या पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर काही काळासाठी रस्त्यावरची वाहतूकही थांबवण्यात आली आहे. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
असा झाला अपघात..
मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर, कार आणि आणखी एक कंटेनरअशी तिन्ही वाहनं एकाच दिशेने भरधाव वेगाने जात होती. पुढील कंटेनरनचालकाने अचानक ब्रेक लावला. मागून येणाऱ्या कारचालकाला वाहन नियंत्रणात आणता न आल्यानं ती कार पुढील कंटेनरवर धडकली. त्यानंतर मागील कंटेनरही मधल्या कारवर आदळला. या धडकेनंतर काही क्षणातच दोन्ही कंटेनरना आग लागली.


