जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पालिकेच्या बांधकामाचे बिल अदा करण्याच्या बदल्यात कंत्राटदाराकडून आयुक्तांनी तब्बल १० लाख रुपयांची लाच घेतली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आयुक्तांना रंगेहाथ पकडले आहे. आयुक्तांनाच अटक झाल्याची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आयुक्तांच्या मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानी झडती घेत आहेत. जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून १० लाखांची लाच घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पालिका आयुक्तांच्या मोती बाग येथील शासकीय निवासस्थानाची झडती घेतली जात आहे. विभागाकडून आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे.
लाचलुचपत विभागाने सापळा रचून महानगरपालिकेच्या आयुक्तांनाच लाच घेताना अटक केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. एका कंत्राटदाराने आयुक्तांविरोधात तक्रार दाखल केली होती. लाच घेण्यासाठी आयुक्तांनी तक्रारदार कंत्राटदाराचे बिल अडकले होते. बिलाच्या संदर्भात पालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दहा लाखाची लाच मागितली होती.
या संदर्भात कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त सफाई कामगारांकडूनही २० लाख रुपयांची मागणी करत होता. सफाई कामगाराचे काहीतरी काम करून देण्यासाठी आयुक्तांनी लाच मागितली होती.


