सिया गोयल या २० वर्षांच्या तरुणीने तिचा होणारा नवरा केतन अग्रवाल याची १८ जूनला लोहगडावरुन ढकलून देत हत्या केली. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं त्यामुळे तिने हे धक्कादायक पाऊल उचललं. सिया गोयलचं चेतन चौधरी या तरुणावर प्रेम होतं. त्याच्या साथीनेच सियाने केतन अग्रवालला संपवलं आणि केतन सेल्फी काढताना पडला आणि मृत झाला असा बनाव रचला होता. पण सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पैलू तपासल्यानंतर हा अपघात नसून हत्या आहे हे समोर आलं. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. तर नेटकरीही या प्रकरणी विविध प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणाबाबत काय सांगितलं?
पोलीस तपासात सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनची हत्या केल्याचे निष्पन्न झाले असले, तरी कड्यावरून केतनला नेमका धक्का कोणी दिला, याचा थांगपत्ता पोलिसांना अद्याप लागलेला नाही. घटनेच्या वेळी केतनच्या अगदी जवळ सिया होती, त्यामुळे तिने धक्का दिला की तिथे दबा धरून बसलेल्या चेतन चौधरीने त्याला दरीत ढकलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केतनला मारायचा प्लॅन किमान एक आठवडा आधीच ठरला होता हे स्पष्ट झाले असले, तरी प्रत्यक्ष कड्यावरून ढकलणारा मुख्य आरोपी कोण, हे पोलीस तपासाच्या पुढील टप्प्यात समोर येण्याची अपेक्षा आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
https://x.com/Shubhamshuklamp/status/2069615197778850077?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2069615197778850077%7Ctwgr%5Ed9384873f4676214803807621373db67e0a226b9%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fabsolute-horror-netizens-react-to-ketan-agarwal-death-demand-strict-action-against-siya-goyal-scj-81-5979996%2F
१८ जून पूर्वी केतन आणि सिया हे दोघंही त्यांच्या लग्नाची तयारी करत होते. या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. राजस्थानातील उदयपूर या ठिकाणी पॅलेसही बुक करण्यात येणार होता. तसंच दोन्ही कुटुंबं उच्चभ्रू असल्याने दोन प्रायव्हेट विमानंही तयार ठेवण्यात येणार होती. या दोघांचाही फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. पण सियाला चेतन चौधरी आवडत होता. त्यामुळे चेतनसह मिळून तिने केतनच्या हत्येचा कट आखला.
तपासादरम्यान समोर आलेले मोबाईल फोनचे डिटेल्स हेच या हत्येचे गुपित उघड करणारे ठरले आहेत. 18 जून या हत्येच्या दिवशी आरोपी चेतन चौधरीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचे ‘लोकेशन’ लपवण्यासाठी एक शातीर चाल खेळली होती. 18 जून रोजी सकाळी सव्वासात वाजेपासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत, असे जवळपास 10 तास चेतन चौधरीने स्वतःचा मोबाईल त्याचा नोकर नीरज कुमारकडे ठेवला होता.
दिवसभरात चेतनच्या मोबाईलवर जेवढे फोन आले, ते सर्व फोन चेतनच्या सांगण्यावरून नीरजने उचलले. जेणेकरून चेतन पुण्यातच किंवा आपल्या दुकानातच हजर आहे, असा आभास निर्माण करता येईल. त्याचवेळी केतनची हत्या करण्यासाठी लोहगडावर गेलेल्या चेतनने स्वतःचा फोन न नेता नीरज कुमारचा मोबाईल सोबत नेला होता.


