लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी E-KYC दुरूस्तीसाठी फक्त एक आठवडा शिल्लक राहिला आहे. पण ई केवायसी करूनही अनेकांना योजनेचा हप्ता मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पण पात्र असतानाही अनेक लाडक्या बहिणींचे मासिक १५०० रूपयांचा लाभ यायचा बंद झाला आहे. त्यांना याची तक्रार कुठे करायची? किंवा हप्ता बंद होण्याचं नेमकं कारण काय? कोणती कागदपत्रे चुकीची तर गेली नाहीत का? याबाबतचे अनेक प्रश्न पडलेले असतात. लाडकी बहीण योजनेचे पैसे का येत नाहीत? याचं उत्तर आता प्रत्येक महिलेला मिळणार आहे.
१५०० रूपयांचा मासिक लाभ का बंद झाला?
पात्र असतानाही अनेक महिलांचा १५०० रूपयांचा लाभ बंद झाल्याच्या तक्रारी येत आहेत. आता हप्ता बंद का झाला? तुमचा अर्ज बाद झाला आहे क? याची माहिती सरकारकडून देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना त्यांच्या अर्जाची स्थिती अधिकृत संकेतस्थळावर अथवा स्थानिक महिला बालकल्याण विभागाच्या कार्यलायत मिळणार आहे. १५०० रूपयांचा मासिक लाभ का बंद झाला? हे आता समजणार आहे. लोकमतने याबाबतचे वृत्त दिले आहेत.
अनेक पात्र महिलांचा लाडकी बहीण योजनेचा १५०० रूपयांचा हप्ता बंद झाला आहे. त्याची काही कारणे समोर आलेली आहे. चुकीचा बँक तपशील, आधार लिंक नसणे, वैयक्तिक माहिती चुकीची आणि कागदपत्रांमध्ये तफावत आढलल्याने अनेक महिलांचा लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला आहे. पात्र असतानाही ज्या महिलांचा १५०० रूपयांचा लाभ बंद झालाय, त्यांना पुन्हा एकदा ईकेवायसी दुरूस्ती करण्याची संधी सरकारकडून देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ईकेवायसीमध्ये दुरूस्ती करता येईल, असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. या दुरूस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत वेळ देण्यात आलेली आहे.
३१ मार्च २०२६ पर्यंत लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी दुरूस्ती करता येणार आहे. पण त्यालाही अट ठेवण्यात आलेली आहे. अपात्र लाडक्या बहिणींचे अर्ज आधीच बाद करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत ७० ते ८० लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. पण काही महिलांना ईकेवायसीत दुरूस्ती करता येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ईकेवायसी करताना चुकीची माहिती भरलेली आहे. पर्याय चुकीचा निवडला आहे, त्याच महिलांना अर्जात बदल करण्याचा परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे.


