लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर….

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही मार्चचा हप्ता मिळालेला नाही. एप्रिल महिन्याचे १८ दिवस उलटून गेले आहेत तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्याचसोबत आता एप्रिलच्या हप्त्याबाबतही प्रश्न विचारले जात आहे. लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.लाडकी बहीण योजनेत अजूनही मार्चचा हप्ता जमा झालेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हप्ता लांबणीवर गेला आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जातो. मागच्या महिन्यातदेखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यामुळे यावेळीदेखील शेवटच्या दोन आठवड्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे महिलांना पुढच्या आठवड्यात खुशखबरी मिळू शकते.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता मार्च-एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. जर असं झालं तर महिलांच्या खात्यात ३००० रुपये एकत्र येऊ शकतात. महिलांना डबल खुशखबरी मिळू शकते. मात्र, ३००० रुपये एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता महिलांना १५०० रुपये की ३००० रुपये येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शेवटची तारीख समोर आली आहे. केवायसी करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत तुम्हाला केवायसीत दुरुस्ती करायची आहे. त्यानंतरच महिलांना लाभ सुरु राहणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles