Friday, February 27, 2026

नगर तालुक्यात २ दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या ‘एलसीबी’ ने आवळल्या मुसक्या

अहिल्यानगर – नगर तालुक्यात चिचोंडी पाटील येथील पवार वस्ती व नारायणडोह गावातील पंढरीनाथ साठे यांच्या घरी रविवारी (दि.२२ फेब्रुवारी) पहाटे दरोडे टाकत कुटुंबियांना मारहाण करत लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदबिबी महाल परिसरामध्ये सापळा लावून पकडले आहे. त्यांच्याकडून कार जप्त करण्यात आली आहे.
सोमीनाथ उर्फ पिप्या मिनाजी काळे (वय ३०),चिंग्या उर्फ सौरभ सचिन काळे (वय २१, दोन्ही रा. कौंडगांव तांडा, कौडगांव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे असून त्यांचे साथीदार चिक्या गोप्या चव्हाण, तुषार नंदु भोसले, आसिफ निमाजी काळे (तिघे रा. कौंडगांव तांडा, कौडगांव, ता. पैठण), भगवान इंपीरियल चव्हाण (रा. वाळुंज, ता. नगर) हे फरार आहेत.

चिचोंडी पाटील व नारायणडोह येथे एकाच रात्रीत दरोडे पडल्यानंतर पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार कबाडी यांना या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पो.नि. कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.हरिष भोये, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, दिपक घाटकर, अतुल लोटके, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे, भगवान धुळे यांचे पथक तपास करत होते.

या पथकाने यापुर्वी दरोड्याचे गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास २५ फेब्रुवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा सोमीनाथ काळे याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची व ते पांढरे रंगाचे कारमधुन चांदबिबी महाल येथुन वाळुंज कडे जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ चांदबिबी महाल परिसरामध्ये सापळा रचुन फोर्ड फिस्टा कार (क्र. एम. एच. ०३ बी. एच. ९००२) ही व त्यामधील सोमीनाथ उर्फ पिप्या मिनाजी काळे व चिंग्या उर्फ सौरभ सचिन काळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली.

पकडलेल्या आरोपींकडून गुन्ह्याचे वेळी वापरलेली ३ लाख रुपये किमतीची कार, १२ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल असा एकुण ३ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी नगर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles