नगर तालुक्यातील बिबट्याचा बंदोबस्त करावा , बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळावी
आहिल्यानगर –नगर तालुक्यातील बिबट्याचा बंदोबस्त करावा , तसेच खारेकर्जुने येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळावी या मागणीचे निवेदन पंचायत समिती माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यानी तहसीलदार संजय शिंदे यांना दिले
सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत आहे. हिंगणगाव, खातगाव, , खारेकर्जुने, टाकळी, निमगाव, हमिदपुर अशा परिसरातील गावांमध्ये फिरत आहे. काल खारेकर्जने येथे दुर्दवी घटना घडली आहे. या सर्व परिसरात कामगार वर्ग, विदयार्थी, शेतकरी वर्ग भीतीदायक परिस्थीतीत आहेत. परिसरात अनेक शाळा तसेत महाविदयालये असून विदयार्थाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभाग दुर्लक्ष करत असून त्यांची यंत्रणा अपुरी पडत आहे. भविष्यात अशा दुर्घटना वाटु नयेत यासाठी तात्काळ सर्व आवश्यक ठिकाणी पिंजरे लावून बंदोबस्त करावा, अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल. पीडीत कुटुंबियांना शासनाकडुन तातडीची मदत मिळावी. यावेळी जिल्हा परिषद अर्थ बांधकाम समिती उपाध्यक्ष प्रताप शेळके, पंचायत समिती माजी सभापती रामदास भोर,बि.डी. कोतकर सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते


