केतन अग्रवाल दरीत कोसळल्यानंतर सिया गोयल काय ओरडत आली? लोहगडाच्या सुरक्षा रक्षकाने काय सांगितलं?

केतन अग्रवाल या तरुणाला लोहगडावरुन धक्का देण्यात आला आणि त्याची हत्या करण्यात आली. सिया गोयल या त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच हे कृत्य केलं असा आरोप तिच्यावर आहे. तसंच या प्रकरणी सियाला तिचा प्रियकर चेतन चौधरी यानेही साथ दिली असाही आरोप आहे. केतन अग्रवाल याचा मृत्यू हा अपघात आहे असं सियाने भासवलं होतं. सुरुवातीला पोलिसांनाही हा अपघातच वाटला होता. पण केतनच्या घरातल्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि सियाने माहिती देताना केलेली गफलत लक्षात आणून दिली तेव्हा तपासाची चक्रं हलली. ज्यानंतर २३ जून रोजी या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्राला हादरवणारं हे प्रकरण ठरलं आहे. याबाबत नवनवीन माहिती समोर येते आहे. केतन अग्रवाल जेव्हा लोहगडावरुन दरीत कोसळला तेव्हा सिया काय ओरडत आली याची माहिती समोर आली आहे. लोहगडाचे सुरक्षा रक्षक धीरज जाधव यांनी ही माहिती दिली आहे.

मी लोहगडावरच होतो, पण जिथे होतो ते ठिकाणी केतन कोसळला तिथून बऱ्यापैकी दूर आहे. मी गडाच्या त्या बाजूला होतो तितक्यात मी आवाज ऐकला. मी या ठिकाणी धावत आलो तर सिया गोयल ही मुलगी हेल्प हेल्प असं ओरडत होती. तिथे काही पर्यटकही जमा झाले, ती सगळ्यांना सांगत होती इथून कुणीतरी पडलंय बघा. मी हे ऐकलं आणि तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. असं धीरज जाधव यांनी एनडीटीव्हीला सांगितलं. सिया गोयल हेल्प हेल्प असं ओरडत आली होती असंही त्यांनी सांगितलं. केतन अग्रवाल हा दरीत कोसळला तेव्हा तिचे हे पहिले शब्द होते असंही धीरज जाधव यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की गडावर २४ तास सुरक्षा रक्षक असतात. शिवाय पोलीस चौकीही गडापासून जवळच्या अंतरावर आहे. त्यामुळे मी पोलिसांना फोन केल्यावर काही वेळातच पोलीस आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles