महाराष्ट्रातील हॉटेल आणि बार मालकांनी राज्य सरकारच्या मद्यावरील करवाढीच्या निर्णयाविरोधात आज राज्यव्यापी संप पुकारला आहे. या बंदमध्ये सुमारे २२,००० हॉटेल्स आणि बासहभागी होणार आहेत. यामुळे राज्यातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मद्यपींसोबतच खवय्यांचे खायचे आणि प्यायचेही वांदे होणार आहेत.
मद्यावरील करवाढीमुळे हॉटेल आणि बार मालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने हा बंद पुकारला आहे. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या मते, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, लोणावळा, महाबळेश्वर, पालघर, वसई यासह अनेक शहरांतील स्थानिक हॉटेल संघटनांनी बार आणि मद्यसेवा बंद ठेवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. असोसिएशनचे प्रमुख जॉन डिसुझा यांनी सांगितले की, ही करवाढ हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी घातक ठरू शकते. ही वाढ आमच्या व्यवसायाच्या मुळावर उठली आहे. अनेक छोट्या-मोठ्या आस्थापनांना यामुळे बंद पडण्याची वेळ येऊ शकते.
महाराष्ट्रातील पर्यटन आणि व्यावसायिक आतिथ्य क्षेत्राचा आधार असलेल्या रेस्टॉरंट्स आणि बारवर या करवाढीचा मोठा परिणाम होईल. यामुळे महाराष्ट्र हे बार चालवण्यासाठी देशातील सर्वात महाग राज्य बनण्याचा धोका आहे, ज्याचा फटका पर्यटक, हॉस्पिटॅलिटी आणि स्थानिक व्यावसायिकांना बसू शकतो, असा संताप असोसिएशनकडून व्यक्त करण्यात येतोय.
उत्पादन शुल्कात ६०% वाढ.
भारतीय बनावटीच्या परदेशी दारूंवर १०% मूल्यवर्धित कर.
एफएल-३ परवाना शुल्कात १५% वाढ.


