राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!

राज्यातील रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा उभारल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे एक रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी आंदण दिल्या जाणार आहेत. राज्यातील प्रमुख सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या परिसरात धर्मशाळा आणि विश्रामगृहे उभारण्याची जबाबदारी गुजरातमधील सेवादान आरोग्य फाऊंडेशन या संस्थेला देण्यात आली आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केला आहे. या निर्णयानुसार संबंधित संस्थेला धर्मशाळा उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या किमतीच्या सरकारी जमिनी वार्षिक केवळ एक रुपया नाममात्र भाडेपट्ट्यावर तब्बल 49 वर्षांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
धर्मशाळा आणि विश्रामगृहांचे बांधकाम पुढील शासकीय रुग्णालयांच्या परिसरात करण्यात येणार आहे.

1 बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय, पुणे.

2. सर जे. जे. समूह रुग्णालय, मुंबई.

3 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

4 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर.

5 वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ.

6 छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर.

या सर्व ठिकाणी अहमदाबादस्थित हर्षद शहा आणि मोहित शहा यांच्या सेवादान आरोग्य फाऊंडेशन मार्फत धर्मशाळा उभारण्यात येणार आहेत.
शासन निर्णयानुसार या धर्मशाळांमधील निवास व्यवस्था आणि इतर सुविधा फक्त शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच उपलब्ध असतील. या जागेचा कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक, व्यापारी किंवा खासगी कारणासाठी वापर करता येणार नाही, अशी स्पष्ट अट सरकारने घातली आहे.

धर्मशाळांचे बांधकाम, निधी उभारणी, सुसज्जीकरण, संचालन, देखभाल, स्वच्छता, सुरक्षा, मनुष्यबळ, विमा तसेच आवश्यक शासकीय परवानग्या मिळवण्याची संपूर्ण जबाबदारी सेवादान आरोग्य फाऊंडेशन यांच्यावर राहणार आहे. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर दोन वर्षांच्या आत धर्मशाळांचे बांधकाम पूर्ण करून त्या कार्यान्वित करणे संस्थेला बंधनकारक असेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles