राज्य प्रशासनात मोठे फेरबदल; कोकण विभागीय आयुक्तपदी रुबल अग्रवाल…

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन समाप्त होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल केले असून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वादग्रस्त सदस्य सचिव एम.देवेंद्र सिंह यांची तडकाफडकी बदली केली आहे. तर कोकण विभागीय आयुक्तपदी रुबल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने शुक्रवारी सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना विधिमंडळ कामकाजाबाबत अधिक माहिती देण्यासाठी न आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम.देवेंद्र सिंह यांना निलंबित करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष यांनी दिले होते.
सिंह यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईमुळे सत्ताधारी भाजप शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला होता. सिंह यांनी विधानसभा अध्यक्षांची माफी मागितल्यानंतर त्यांचे निलंब रद्द करून पुन्हा एकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्त करण्यात आले होते. मात्र अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंह यांच्या बदलीचे आदेश दिले असून आता त्यांची नियुक्ती मुंबई महापालिकेत सह आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नयना गुंडे यांची अमरावती विभागीय आयुक्तपदी, श्वेता सिंघल यांची महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.
सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी), राहुल रेखवार यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून, डॉ. मैनक घोष यांची सांगली जिल्हाधिकारी म्हणून तर प्रियंवदा म्हाड्डळकर धाराशिव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles