Thursday, February 19, 2026

कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? भाजपचे १४२५ नगरसेवक विजयी

राज्यातील २९ महानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली. या सर्व महानगर पालिकेवर महायुतीमधील भाजपसह सर्वच मित्र पक्षांना चांगले यश मिळून आले. या सर्व महापालिकांमध्ये भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता मिळवली. महत्वाचे म्हणजे या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. कारण या महापालिकांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. नवी मुंबई, पनवेल, नाशिकसह १६ महानगर पालिकांवर भाजपची सत्ता आली आहे. राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक आले ते आपण एका क्लिकवर पाहणार आहोत….

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. भाजप- शिंदेसेनेच्या महायुतीने सर्वात जास्त जागा मिळल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेली मुंबई महानगर पालिका काबिज केली. मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपचे ८९ उमेदवार विजयी झाले तर शिंदेसेनेचे २९ उमेदवार विजयी झाले.

या निवडणुकीमध्ये महायुतीला शह देण्यासाठी तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. ठाकरे बंधूंनी युती केली आणि त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पाठिंबा दिला. या निवडणुकीत ठाकरेसेना ६५, मनसे ६, शरद पवारांची राष्ट्रवादी १, काँग्रेस २४, अजित पवारांची राष्ट्रवादी ३, एमआयएम ८, इतर २ जागांवर विजयी झाले.

राज्यात कुणाचे किती उमेदवार विजयी -भाजप – १४२५ उमेदवार

बहुजन समाजवादी पार्टी – ६ उमेदवार

काँग्रेस – ३२४ उमेदवार

राष्ट्रवादी अजित पवार गट – १६७ उमेदवार

शिवसेना शिंदे गट -३९९ उमेदवार

मनसे – १३ उमेदवार

शिवसेना ठाकरे गट – १५५ उमेदवार

राष्ट्रवादी शरद पवार गट – ३६ उमेदवार

कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता?

मुंबई – भाजप-शिंदेसेना

ठाणे – शिंदेसेना- भाजप

नवी मुंबई- भाजप

कल्याण-डोंबिवली – शिंदेसेना- भाजप

उल्हासनगर – शिंदेसेना-स्थानिक आघाडी

भिवंडी-निजामपूर – त्रिशंकू

पनवेल- भाजप

मीरा-भाईंदर – भाजप

वसई-विरार – बविआ

नाशिक – भाजप

मालेगाव – स्थानिक आघाडी

धुळे- भाजप

जळगाव – भाजप

अहिल्यानगर- भाजप- राष्ट्रवादी अजित पवार गट

पुणे – भाजप

पिंपरी-चिंचवड – भाजप

सांगली-मिरज-कुपवाड – भाजप

सोलापूर – भाजप

कोल्हापूर – महायुती

छत्रपती संभाजीनगर – भाजप

परभणी – महाविकास आघाडी

नांदेड- वाघाळा – भाजप

लातूर- काँग्रेस

अमरावती – भाजप-युवा स्वाभिमान

अकोला – भाजप

नागपूर – भाजप

चंद्रपूर – काँग्रेस

जालना – भाजप

इचलकरंजी – भाजप

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles