सुपा एमआयडीसी परिसरात गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना अटक

पारनेर-नवीन सुपा – म्हसणे फाटा औद्योगिक वसाहत परिसरात उशिरा रात्री हॉटेल चालकावर पिस्टल रोखून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.13) घडली होती. याप्रकरणी सुपा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.

संकेत प्रदीप गावडे (रा. सुपा, ता. पारनेर) यांनी सुपा पोलिसांत फिर्याद दिली होती. सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तपास पथकाची नेमणूक केली होती. पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे नगर-पुणे महामार्गावरील एका हॉटेलमध्ये छापा टाकून आरोपी अक्षय उर्फ आकाश संजय वाव्हळ, यश बाळू जाधव (दोघे रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर) व शुभम ठकसेन वाळके (रा. उख्खलगाव, ता. श्रीगोंदा) यांना ताब्यात घेतले. अधिक तपास सुपा पोलिस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles