राष्ट्रवादीतील खदखद्….आदिती तटकरेंच मंत्रिपद धोक्यात, ‘या’ आमदाराला लागणार लॉटरी

आमदार रोहित पवार हे सातत्याने अजितदादांच्या गोटातील घडामोडी आणि कानगोष्टी चव्हाट्यावर आणत आहेत. आता ही त्यांनी असाच एका मोठा दावा केला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना साईड लाईन केल्याची बातमी समोर आली. तर लागलीच या बातमीचे राष्ट्रवादीतून खंडणही करण्यात आले.

सध्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांमधील कथित ऑडिओ क्लिप वादाच्या केंद्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे. त्यावर आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केलं आहे. दादा गेल्यानंतर १२ व्या दिवशी पत्रावर सही केली गेली, ती सही कोणाची होती. एका ऑडिओमध्ये या दोघांमधील एक नेता दादांवर खालच्या भाषेत बोलत होता. ही ऑडिओ क्लिप दुसरं पत्र जाण्याअगोदर सुनेत्राताईंना कुणीतरी ऐकवली. ज्या व्यक्तीकडे ऑडिओ क्लिप आहेत त्याच्याशी माझं फोनवरुन संभाषणं झालं. तो व्यक्ती मला ही ऑडिओ क्लिप व्हॉट्सअपवर पाठवत नाही. पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ती ऐकली आहे. अनुभवी नेत्यांना किंवा लोकांना सहजासहजी कुणी डावलत नसतं. खरंच हे पक्षाला प्रामाणिक असते तर त्यांचं पद का घालवलं असतं. या दोघांना डावलतायत हे आपल्याला पाहायला मिळतंय. जो संदेश जायला पाहिजे तो लोकांपर्यंत गेला आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांना कुणीही भेटू शकतं. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे शरद पवार यांनी सांगितले आहे. तर आदिती तटकरेंचं पद घालून सुनिल शेळकेंना पद दिलं जाऊ शकतं. राज्यमंत्र्याला मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, असा मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुढच्या काही महिन्यात काही होऊ शकतं, असे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles