खुनाच्या गुन्हयात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.अजिनाथ महादेव आव्हाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की दि. ०४/०७/२०२४ रोजी फिर्यादी शालिका रमेश चव्हाण वय-३० वर्ष रा धंदा मजुरी रा पांगरमल ता.जि अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली की, दिनांक ०४/०७/२०२४ रोजी रात्री १२/३० ते ०४/३० वा चे दरम्यान पांगरमल ग्रामपंचयातीसमोर आरोपी १) महादेव आव्हाड २) सरंपच आमोल आव्हाड ३) उध्दव महादवे आव्हाड ४) अजिनाथ महादेव आव्हाड ५) गणेश आंबादास आव्हाड ६) संदीप पंढरीनाथ आव्हाड व इतर २० ते २५ अनोळखी इसमांनी गौरकायदयाची मंडळी जमवुन हातात कु-हाडी कोयते व लाकडी दांडके घेवुन फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा रामलाल रमेश चव्हाण दिर चांगदेव नामदेव चव्हाण व पकडलेला इसम असे पांगरमल गावातील शेळयांची चोरी करतो असे बोलुन चौघांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांने मारहाण करुन फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा व पकडलेले इसमास जखमी करुन फिर्यादीचा दिर चांगदेव नामदेव चव्हाण वय-२५ वर्ष रा पखोरा ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर याला जिवंत ठार मारले . उध्दव आव्हाड व इतर अनोळखी इसमाने फिर्यादीचे कपडे फाडुन त्यांना लज्जा उत्पन्न केली व आरोपींना घाणघाण जातीवाचक शिवीगाळ करुन जिवंत ठार मारण्याची धमकी दिली तसेच मोटारसायकलचे नुकसान केले . जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केले वैगरे मचकुराच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि.५४२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२),१९१ (२) १९१ (३), १९०,१०३(१), १३०(२),११८ (१), ११५(२), ७४,३५२,३५१(२), ३२४ (४) सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारी २०१५ चे कलम ३ (१), (आर) (एस) ३(२), (व्हि-९), ३ (२) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयात यापूर्वी आरोपी १) महादेव किसन आव्हाड २) आमोल भारत आव्हाड ३) उध्दव माहेदव आव्हाड ४) गणेश आंबादास आव्हाड ५) संदीप पंढरीनाथ आव्हाड ६) अक्षय आंबादास आव्हाड ७) आकाश अशोक वाकडे सर्व राहणार पांगरमल ता जि अहिल्यानगर यांना अटक केली आहे.
सदर गुन्हयात आरोपी आजिनाथ महादेव आव्हाड, रा पांगरमल हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता. सपोनि माणिक बी. चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर फरार आरोपी हा पांगरमल या ठिकाणी आहे त्यावेळी सदर आरोपीचा शोध घेण्याकरीता गुन्हे तपास पथकाचे अमंलदार यांना रवाना केले. पांगरमल या ठिकाणी जावुन सदर आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आला. सदर ओरापीस एमआयडीसी पोस्टे गु. रजि.५४२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२),१९१ (२) १९१ (३), १९०,१०३(१), १३०(२),११८ (१), ११५(२), ७४,३५२,३५१(२),३२४ (४) सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारीत २०१५ चे कलम ३ (१), (आर) (एस) ३(२), (व्हि-९).३(२) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३)/ १३५ प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक केली असुन पुढील तपास शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी सोमनाथ घार्गे सो पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबमें, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक बी चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई मनोज मोंढे, सफौ राकेश खेडकर, पोहेकॉ राजू सूद्रीक, पोहेकॉ संदीप पवार, पोहेकॉ सचिन आडवल, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ नवनाथ दहिफळे, पोकॉ सुरज देशमुख, पोकॉ ज्ञानेश्वर आघाव तसेच उपाविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगरचे पोकॉ निखील मुरुमकर, पोकॉ सचिन वीर, दक्षिण मोबाईल सेल अहिल्यानगर चे पोकॉ राहुल गुंडु यांचे पथकाने केली आहे.


